तळेगाव (श्या.पं.)
robber बंधन बँकेच्या बचत गट वसुली कर्मचार्याची पैशांनी भरलेली बॅग लुटून ४८ हजार ७५० रुपयांची रोकड पळवून नेल्याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी वेगाने तपास करत एका आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत दोन दुचाकी व चोरीच्या रकमेपैकी ३० हजार ५०० रुपये रोख असा १ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
robber पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक मांडवगणे (२४) रा. धामणगाव जुना हे बंधन बँकेचे वसुली कर्मचारी असून ९ जून रोजी आनंदवाडी, भारसवाडा परिसरातून भीष्णूर येथे वसुलीसाठी जात असताना लघुशंकेसाठी थांबले होते. दरम्यान, दोन दुचाकींवर आलेल्या तीन जणांनी त्यांच्या ताब्यातील रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी तळेगाव पोलिसात तक‘ार दाखल करण्यात आली होती.
robber तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने इतर दोघांची नावे उघड केली. त्यानंतर पोलिसांनी गौरव डोळस (२३) रा. आनंदवाडी याला अटक केली. चोरट्यांकडून एम. एच. २७ बी. एन. ९१४५ व एम. एच. ४० ए. एच. ७१७३ क‘मांकाच्या दोन दुचाकी तसेच चोरीच्या रकमेपैकी ३० हजार ५०० रुपये रोख जप्त केली. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग‘वाल, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशीव वाघमारे व उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक मंगेश भोयर यांच्या नेतृत्वात राजेंद्र जयसिंगपुरे, निखिल काळे, अतुल अडसड व अंकुश वडे यांनी केली.