नागपूर,
shri mahalakshmi temple मधुबन लेआउट येथील श्री महालक्ष्मी मंदिराचा ३३वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त सकाळी श्री महालक्ष्मी मातेला अभिषेक कल्याणी लांबे आणि शैलेश लांबे यांच्या हस्ते करण्यात आला. संध्याकाळी हरिभक्त परायण दिगंबर बुवा नाईक यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. कीर्तनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मंदिरात वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. दररोज योग वर्ग, मंगळवारी साप्ताहिक भजन, शुक्रवारी श्री दत्त उपासना, रविवारी नरेंद्र महाराज यांची उपासना, उन्हाळ्यात संस्कार वर्ग, हेल्थ चेकअप कॅम्प, नवरात्रीत नऊ दिवस उत्सव तसेच ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात.
मंदिराचे अध्यक्ष शरदचंद्रजी लांबे, मंदिराचे सभासद, सोसायटीचे सदस्य तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक या सर्व उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेतात आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतात. गेल्या ३२ वर्षांपासून मंदिरात विविध उपक्रम अविरतपणे राबविले जात आहेत.
या कार्यक्रमाला श्याम पंडित, सुधीर लेहगावकर, अनंता पंडित, श्रीरंग माईनकर, माधव जगताप, अतुल जोशी, किरण धुळे, सुहास पुरोहित, पाठक, आसावरी कोठीवान, जयश्री पुरोहित, सुनीता अलोणी, संध्या कुलकर्णी, रेणुका देशमुख, गायत्री देशकर, शहाणे, खैरे, कामडी, बाळ कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कीर्तनानंतर आरती आणि प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य: आसावरी कोठीवान, संपर्क मित्र