शिवणी घाटावरून घरकुल लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाची वाळू

निवेदन प्राप्त होताच तहसीलदारांची चौकशी

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
समुद्रपूर
substandard sand तालुयातील शिवणी घाटावरून घरकुल लाभार्थ्यांना निकृष्ट वाळूचा पुरवठा केला जात होता. त्यामुळे तालुयातील घरकुल लाभार्थ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देऊन समस्या सादर केल्या. निवेदन प्राप्त होताच तहसीलदारांनी चौकशी करून त्वरित उत्कृष्ट वाळू उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
 
sand
substandard sand  शासनाच्या महत्वाकांक्षी घरकुल योजनेअंतर्गत गोरगरिबांना हकाचे घर बांधण्यासाठी वाळू मोफत देण्याचा स्तुत्य निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, समुद्रपूर तालुयातील शिवणी वाळू घाटावर या नियमांची पायमल्ली करीत शिवणी घाटधारक घरकुल धारकांना शासकीय पास असूनही अत्यंत निकृष्ट दर्जाची वाळू देत आहेत. या निकृष्ट वाळूमुळे घरांचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे होत आहे. जर लाभार्थ्यांनी खाजगीरित्या वाळू बोलावली, तर याच शिवणी घाटावरून तात्काळ उत्तम दर्जाची वाळू पाठवली जाते व  वाळू भरण्याकरिता ५०० रुपये आकारले जाते. सध्या गाव परिसरामध्ये जेसीबी मालक १ हजार रुपये तासाप्रमाणे पैसे आकारतात मग या घाट मालकाना वाळू भरण्याकरिता अडीच तास लागतात काय, असा प्रश्न लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे. मोफत हक असणार्‍या गरीब लाभार्थ्यांना त्रास देणे आणि हा थेट शासनाच्या आदेशाचा अवमान आहे. त्यामुळे शिवणी वाळू घाटाची व तेथील कामकाजाची त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणी घरकुलधारकांनी केली.
 
substandard sand  तालुयातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ उत्तम दर्जाची वाळू मोफत मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन लाभार्थ्यांनी दिले होते. दरम्यान, घरकुल लाभार्थ्यांचे निवेदन प्राप्त होताच चौकशीचे आदेश देऊन घाट धारकांना घरकुल करिता उत्कृष्ट वाळू उपलब्ध करून देण्याच्या सूचना तहसीलदार कपिल हाटकर यांनी दिल्या.