लंडनमध्ये दोन ट्रेनचा भीषण अपघात

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
लंडन,
two trains accident in London लंडनमध्ये शुक्रवारी दुपारी घडलेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. उत्तरेकडील बेडफोर्ड परिसराजवळ दोन प्रवासी ट्रेनची जोरदार धडक झाली असून या दुर्घटनेत ट्रेन चालकाचा मृत्यू झाला आहे, तर ८० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सुमारे ५:१५ वाजता हा अपघात झाला. दोन्ही ट्रेन लंडनच्या सेंट पॅनक्रस स्टेशनच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, एक ट्रेन थांबलेली असताना मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने तिला जोरदार धडक दिली. वेग कमी असल्याचे सांगितले जात असले तरीही टक्कर इतकी भीषण होती की अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले.
 
 
 
two trains accident in London
अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. आपत्कालीन सेवा, एअर अॅम्ब्युलन्स आणि बचाव पथके तातडीने दाखल झाली आणि जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. पोलिसांनी या घटनेला “मोठी आपत्कालीन दुर्घटना” म्हणून घोषित केले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले असून दुर्दैवाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.प्रवाशांनी या घटनेचे वर्णन अत्यंत भयानक शब्दांत केले आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, अचानक झालेल्या धडकेमुळे लोक सीटवरून पुढे फेकले गेले, काहीजण रडत होते, तर काही जखमी अवस्थेत जमिनीवर पडले होते. धुराचे लोट आणि गोंधळामुळे परिस्थिती अधिकच भीषण झाली होती.