उस्ताद झाकीर हुसेन स्मृती पुरस्काराने वेद ढोक सन्मानित

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
ustad zakir husen smruti puraskar नागपूरचा युवा तबलावादक वेद ढोक याला मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील युवा प्रतिभा प्रोत्साहन मंच संस्थेतर्फे ‘उस्ताद झाकीर हुसेन स्मृती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. छिंदवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हरेन्द्र नारायण यांच्या हस्ते वेदला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
 
ved ds
 
या कार्यक्रमात देशभरातून निवड झालेल्या संगीत क्षेत्रातील विविध शाखांशी संबंधित प्रतिभावंतांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. त्यात वेद ढोक याचाही समावेश होता. बावीस वर्षीय वेद हा तबला विशारद असून आकाशवाणीचा ग्रेडेड कलाकार आहे. वडील व गुरू विनय ढोक यांच्याकडून त्याने तबल्याचे प्रशिक्षण घेतले असून सध्या तो प्रसिद्ध तबलावादक पुण्याचे गुरू पंडित रामदास पळसुले यांच्याकडे शिक्षण घेत आहे.