योग महोत्सवातून निरोगी जीवनाचा संदेश

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
yog mahotsav आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला पतंजली योग समिती, नागपूर पश्चिम विभागातर्फे आणि एसएसआरआर चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने लक्ष्मीनगर येथील श्री सिद्ध हनुमान मंदिर परिसरात ‘योग महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. तापस कुमार डे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात शहरातील विविध भागांतील २०० हून अधिक योगसाधक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
 
 
yog
 
याप्रसंगी मनपा स्थायी समिती सभापती शिवानी दानी-वाखरे, लक्ष्मीनगर झोन सभापती लक्ष्मी यादव, नगरसेविका माया हाडे, नगरसेवक अमोल श्यामकुळे, लखन येरावार, श्री सिद्ध हनुमान मंदिराचे कोषाध्यक्ष घनश्याम राठी, पतंजली परिवार महाराष्ट्र पूर्वचे मुख्य संरक्षक यशपाल आर्य, प्रांतीय कोषाध्यक्ष प्रदीप काटेकर, भारत स्वाभिमानचे प्रभारी डॉ. अविनाश कोकाटे, पतंजली योग समितीचे प्रभारी डॉ. संजय खोंडे, नागपूर जिल्हा संघटन मंत्री तापस कुमार डे, सहप्रभारी अशोक बोंद्रे, पश्चिम विभाग प्रभारी चिंतामण कान्हरे तसेच महिला पतंजली समितीच्या पश्चिम विभाग प्रभारी वनीता मुंगेलवार आदी उपस्थित होते.
 
 
मुख्य योग सत्रात डॉ. संजय खोंडे यांनी आयुष मंत्रालयाच्या ‘कॉमन योग प्रोटोकॉल’नुसार विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचा सराव करून घेतला. विशाखा फेंडर आणि शलाका मोहिते यांनी सत्राच्या आयोजनात सहकार्य केले. यावेळी अनेक समर्पित योगसाधकांना सर्वोत्कृष्ट कामगिरी, सर्वोत्कृष्ट उपस्थिती, सर्वोत्कृष्ट सहयोगी योगी आणि सातत्य विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.