योग-प्राणायाम हेच खरे अमृत : आ. कुणावार

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
हिंगणघाट
yoga patanjali  चाळीशी उलटल्यानंतर प्रत्येकासाठी योगा आणि प्राणायाम हे अमृतासमान आहे. आज वाढलेल्या दुर्धर आजारांवर रात्री वेळेवर झोपणे व सकाळी लवकर उठून योग-प्राणायाम करणे हेच खरे अमृत आहे, असे प्रतिपादन आमदार समीर कुणावार यांनी केले.
 
kunawar
 
yoga patanjali  योगाचे महत्त्व ओळखून पतंजली परिवार हिंगणघाटच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून १५ ते २१ जून पर्यंत स्थानिक आर. एस. बिडकर महाविद्यालयात आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शारीरिक आणि मानसिक आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यासोबतच योगाचा प्रत्येकाच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडण्याकरिता दररोज पहाटे ५.३० ते सकाळी ७.३० वाजेपर्यंत भारत सरकार आयुष मंत्रालय व्दारा निर्देशित सामान्य अभ्यासक‘मानुसार योग व प्राणायम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
 
yoga patanjali  आमदार समीर कुणावार पुढे म्हणाले, माझ्या कार्यालयातून दररोज ५०-६० पत्र निर्गमित होतात. त्यातील किमान १५ पत्र केवळ कॅन्सर, हृदयविकार अशा दुर्धर आजारांच्या रुग्णांना शिफारस म्हणून द्यावी लागतात. आजारांचे प्रमाण भयावह वाढले आहे. त्यावर योग हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे. जो योग करतो तोच खरा सुखी माणूस व त्याचे कुटुंब सुखी असते. आपल्या ऋषीमुनींनी दिलेला योगाचा वारसा बाबा रामदेव यांनी घराघरात, मनामनात पोहोचवला. आज पूर्ण जगाने भारताचा हा योग स्वीकारला आहे, असेही ते म्हणाले.
 
yoga patanjali  निरोगी आयुष्यालाच अर्थ आहे, म्हणून सर्वांनी प्राणायाम करा व आयुष्य सुखी करा. रविवार २१ जून रोजी १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. हे आपल्याला मिळालेले अमृत प्रत्येकाने घेतले पाहिजे, असे आवाहनही आमदार कुणावार यांच्यासह राजा महाराज शेंडे, माधुरी शिवणकर, संगीता आगरकर, प्राची पाचखेडे, विद्या पेंडके, प्रमोद भाईमारे, योगेश सुंकटवार, प्रा. अजय मोहोड, प्रा. अनिल तरोडकर, रामानंद चौधरी, सुनील डांगरे, सुरेश दविले, अनिल राजपांडे, रविप्रकाश भालेकर, आयुष हावगे, आदींनी केले. संचालन संजय अवचट यांनी केले तर आभार प्राची पाचखेडे यांनी मानले.