अमरावती,
neet-exam : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट-यूजी) रविवारी अमरावती शहरातील १४ केंद्रावर शांततेत पार पडली. अमरावती विभागातील एकूण पात्र ४७७० विद्यार्थ्यांपैकी ४३४५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परीक्षा केंद्रावर विशेष वाहनातून कडक सुरक्षेत प्रश्नपत्रिका पोहचविण्यात आल्या होत्या.
दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नीट यूजी परीक्षा झाली. विद्यार्थीना परीक्षेत सहभागी होण्यासाठी वेळेच्या दोन तस पूर्वीच परीक्षा केंद्रावर बोलविण्यात आले होते. प्रवेश ओळखपत्र व सखोल तपासणी अंती विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडण्यात आले. जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग व शिक्षण विभागाच्या अधिकार्यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही परीक्षा यशस्वी करण्यात आली.
दरम्यान, रविवारी स्टेट बँक कोषागार कार्यालयातून कडक बंदोबस्तात प्रश्नपत्रिका परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी केंद्रावर नेण्यात आल्या. परीक्षेच्या बंदोबस्तासाठी केंद्रीय सुरक्षा बलाची तुकडी, १ उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त, आठ पोलिस निरीक्षक व १० उपनिरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती. विशेष लक्ष ठेवण्यासाठी पाच पोलिस कर्मचारी साध्या वेशात प्रत्येक केंद्रावर तैनात होते. याशिवाय प्रत्येक केंद्रावर ४५ पोलिस तर २२ महिला पोलिस कर्मचारी तैनात होत्या. परीक्षा केंद्रावर केवळ परीक्षार्थी व अधिकृत कर्मचार्यांना प्रवेश देण्यात आला.