अकोट न. प. च्या पोटनिवडणूकीत भाजपचा विजय

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
अकोट
Akot नगर परिषद निवडणूक अंतर्गत प्रभाग क्रमांक 4 मधील अ व ब गटात भारतीय जनता पक्षाने विजयाची नोंद केली आहे. दोन्ही गटांमध्ये भाजप उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला.
अ गटातून भाजपचे उमेश हरसुलकर यांनी 1,401 मते मिळवत विजय संपादन केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना (शिंदे गट)च्या सौ. रेश्मा चंदन चंडालिया यांना 819 मते मिळाली. ब गटातून भाजपच्या सौ. शारदा योगेश नाठे यांनी 1,706 मते मिळवत दणदणीत विजय मिळविला. त्यांच्या प्रतिस्पर्धी भारती प्रशांत नाठे यांना 778 मते मिळाली.विजयाची अधिकृत घोषणा होताच नगर परिषद परिसरात भाजप कार्यकर्ते व समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला. गुलालाची उधळण, विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी विजयी उमेदवारांसह समर्थकांनी प्रभागातील मतदारांचे आभार मानले . मतमोजणी नगरपालिकेच्या कार्यालय सकाळी सुरू झाली होती.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शशिकांत बाबर यांनी काम पहिले. मतमोजणी शांतपणे फार पडली असून यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त होता.