मुंबई
Akshay Kumar Viral Video बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या आपल्या आगामी चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, त्याच्या सहजसोप्या आणि विनोदी स्वभावामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच विमानतळावर पापाराझींशी झालेल्या त्याच्या मजेशीर संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी आयोजित एका कार्यक्रमासाठी त्याच्या प्रवासादरम्यानचा असल्याचे सांगितले जाते. विमानतळावर पापाराझींनी त्याला घेरून फोटो काढण्यास सुरुवात केली असता, एका फोटोग्राफरने “पाजी, तुम्ही कुठे जात आहात?” असा प्रश्न विचारला. त्यावर अक्षय कुमारने आपल्या खास शैलीत उत्तर देत, “का, तुम्हाला काय वाटतं, हा माझा विषय आहे का?” 'तू मेरा मामा लगता है'... छोड देगा क्या असे म्हटले. त्याच्या या विनोदी प्रतिक्रियेमुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला. त्यानंतर त्याने परिस्थिती सांभाळत आपला प्रवासाचा उद्देशही स्पष्ट केला.
सोशल मीडियावर या व्हिडिओला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेक चाहत्यांनी त्याच्या विनोदबुद्धीचे कौतुक करत त्याला “खरा स्टार” असे संबोधले आहे. अक्षय कुमारच्या या सहज आणि मोकळ्या वागण्यामुळे त्याचा हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला आहे.दरम्यान, अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या कामात व्यग्र आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेला भूत बंगला या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच उल्लेखनीय कामगिरी केल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे.
आता सर्वांचे लक्ष त्याच्या Akshay Kumar Viral Video आगामी वेलकम टू द जंगल या चित्रपटाकडे लागले आहे. दिग्दर्शक अहमद खान यांच्या या बहुचर्चित चित्रपटात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असल्याची माहिती आहे. हा चित्रपट २६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, त्याच्या बॉक्स ऑफिस कामगिरीबाबत निर्माते आणि प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.अक्षय कुमारच्या सतत सुरू असलेल्या चित्रपट प्रकल्पांमुळे आणि सोशल मीडियावरील त्याच्या लोकप्रिय उपस्थितीमुळे तो पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर यश मिळवतो का, याकडे सिनेप्रेमींचे लक्ष लागले आहे.