घरून निघून गेलेल्या अनुजला सिकंदराबादेतून आणले परत

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
सिंदी
Sindhi Railway येथील घरून निघून गेलेला अनुज राऊत याला २४ तासात सिकंदराबाद (तेलंगना) येथून सिंदी पोलिसांनी अवघ्या २४ तासात हुडकून काढले. पोलिसांनी अनुजला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले.
 

Sindhi Railway  
घरातील काम का केले नाही, असा जाब अनुजच्या आईने विचारला असता कुणालाही न सांगता तो घरून निघून गेला. ही बाब वडील सुरेश यांच्या लक्षात येताच त्यांनी मुलगा घरून निघून गेल्याची पोलिसात तक‘ार दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासात अनुजबाबत माहिती घेतली असता तो सिंदी येथील रेल्वे स्टेशनकडे जाताना दिसल्याची माहिती मिळाली. त्याचा तांत्रिक शोध घेतला असता तो सिकंदराबाद (तेलंगणा) येथे गेल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला सिकंदराबाद येथून २४ तासात शोधून पालकाच्या स्वाधीन केले.ही कारवाई पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांच्या निर्देशाप्रमाणे प्रफुल्ल डफ, अतुल मडावी, उमेश खामनकार, नितीन नखाते यांनी केली.