आष्टोणा-दहेगाव रस्ता प्रश्नावर उपोषणाची सांगता

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव,
Ashtona Dahegaon road protest आष्टोणा ते दहेगाव या अतिक्रमित रस्ते तसेच पांदण रस्त्यासाठी 17 जून पासून उपोषणास बसलेल्या नागरिकांच्या समस्यांची दखल घेत आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सकारात्म चर्चा करून उपोषणाची सांगता केली.
 

Ashtona Dahegaon road protest 
आष्टोणा ते दहेगाव या अतिक्रमित रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून पांदण शेतरस्ते कार्यक्रमांतर्गत काम मंजूर करावे व अन्यायग्रस्त शेतकèयांना न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसाठी आष्टीणा येथील भूमिधारक शेतकरी 17 जूनपासून राळेगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले होते. या आंदोलनाची दखल घेत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके यांनी तहसीलदार अमित भोईटे यांच्या मध्यस्थीने उपोषणकर्ते शेतकरी, ग्रामस्थ व भाजप पदाधिकाèयांशी सकारात्मक चर्चा केली. चर्चेनंतर प्रशासनाकडून लिखित आश्वासन देण्यात आले. त्यानंतर उपोषणकर्त्यांना निंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
 
 
आष्टोणा-दहेगाव सरकारी रस्त्याचा प्रश्न गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे परिसरातील शेतकèयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याबाबत विविध स्तरांवर मतभेद निर्माण झाल्याने व काही घटकांकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे सरकारी नकाशात अस्तित्वात असलेला रस्ता अतिक्रमणमुक्त करून खुला करण्याची मागणी अधिक तीव्र झाली होती.शेतकèयांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित शासकीय अधिकारी, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधण्यात आला. सकारात्मक चर्चेनंतर प्रशासनाने आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने शुक्रवारी उपोषणाची यशस्वी सांगता झाली.