भुमराळा
Bhumarala orange orchard damag भूमराळा, ता. लोणार बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील भूमराळा येथील शेतकरी देवानंद सानप यांच्या शेतातील संत्रा बाग पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर असून यावर्षी मान्सून लांबणीवर पडल्याने फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
सानप यांनी चार वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन उप मुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संत्रा बागेची लागवड केली होती. मोठ्या मेहनतीने आणि खर्च करून जोपासलेली ही बाग सध्या पाण्याअभावी सुकू लागली आहे. झाडांची पाने करपून गळत असून उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संत्रा बाग वाचविण्यासाठी शेतकरी देवानंद सानप हे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. उपलब्ध पाण्याच्या स्रोतांमधून सिंचन करून झाडे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असला तरी पावसाअभावी परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. लवकरच समाधानकारक पाऊस न झाल्यास संपूर्ण बाग करपून जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
मान्सूनच्या विलंबामुळे Bhumarala orange orchard damag तालुक्यातील अनेक फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत असून शासनाने परिस्थितीची दखल घेऊन आवश्यक मदत व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. सध्या सर्वांचे लक्ष आकाशाकडे लागले असून लवकर पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.