सीए परीक्षेत प्रेम भोयरचे घवघवीत यश

दास मारुती संस्थांन तर्फे सत्काराचे आयोजन

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
मंगरूळनाथ,
Raju Bhoyar येथील विद्यार्थी प्रेम राजू भोयर याने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या सन २६ च्या अंतिम वर्षाच्या चार्टर्ड अकाउंटंट या सर्वात कठीण परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
 

v 
त्याच्या या यशाबद्दल दास मारुती संस्थांनतर्फे नपचे पाणी पुरवठा सभापती सुधीर घोडचर, बुलढाणा अर्बनचे व्यवस्थापक अनिल राठी, प्रमोद घोडचर, गीता राठी, आनंद राठी, सुधाकर क्षीरसागर, बाळासाहेब घोडचर यांच्या हस्ते प्रेम भोयर व त्यांचे आईवडीलांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सीए परीक्षेत देशभरातील हजारो विद्यार्थी सहभागी होत असतात. त्यामध्ये अत्यल्प विद्यार्थ्यांनाच यश प्राप्त होत असल्याने ही परीक्षा अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. अशा परिस्थितीत मंगरूळनाथ सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने मिळविलेले हे यश कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी मारोतीची महाआरती व नंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. या यशाबद्दल विविध स्तरांतून प्रेम भोयर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.