समुद्रपूरचा विष्णू वयाच्या २१ व्या वर्षी सीए उत्तीर्ण

भारतातून ४४ वा रँक

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
समुद्रपूर,
Vishnu Ramdas Swami   येथील विष्णू रामदास स्वामी याने वयाच्या २१ व्या वर्षी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) तर्फे आयोजित देशातील प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेत उत्तीर्ण झाला असून त्याने भारतातून ४४ वा रँक प्राप्त केला आहे.
 

CA result India 2026, Vishnu Ramdas Swami 
चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा ही अत्यंत कठीण व प्रतिष्ठित व्यावसायिक परीक्षांपैकी एक मानली जाते. अनेक वर्षांच्या परिश्रम, शिस्त, समर्पण आणि दृढनिश्चयाच्या बळावर विष्णूने हे यश प्राप्त केले आहे. विष्णूचे प्राथमिक शिक्षण समुद्रपूर येथून पूर्ण केले. तसेच उच्च माध्यमिक शिक्षण वर्धा येथून पूर्ण केले. येथे त्याने बारावीमध्ये जिल्ह्यात प्रथम क‘मांक पटकावला होता. या यशाबद्दल विष्णूचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.