चैतन्य ग्रुप ऑफ स्पोर्टसद्वारा योग दिवस साजरा

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा,

Yoga Day, क्रिडा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तथा युवा मार्गदर्शन कार्यात अग्रेसर असणारा चैतन्य ग्रुप ऑफ स्पोर्टसतर्फे 21 जूनला सकाळी छत्रपती श्री शिवाजी महाराज फुटबॉल स्टेडियम येथे योग दिवस साजरा करण्यात आला.
 
योग शिक्षक चव्हाण, अनिल लाभसेटवार, गणेश भोयर, ओंकार निमकर, दत्ता राहणे, केदारे, रमेश गूळदे, मिलिंद पांडे, प्रवीण भोयर, अभिजित बेलपत्रेगोकुळ जाधवसह सर्व खेळाडुंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन मिलिंद पांडे यांनी केले. आभारप्रदर्शन राजू भोयर यांनी केले. योगदिनासाठी सूरज तुमसरे, अभिजित बेलपत्रे, महेश भोयर, सिद्धार्थ भोयर, सुयश लाडोले, साहिल शेंदुरकर, बाजिल लांजेवार, शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.
 
 
 


SFD 
 
आध्यात्मिक प्रगतीसाठी 21 जुन अनुकूल दिवस : गजानन चौधरी
21 जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवसाला ‘समर सोल्स्टिस’ असेही म्हणतात, योग परंपरेत या दिवसाला विशेष महत्त्व आहे. कारण हा दिवस आध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल मानला जातो, म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. पहिला योग दिन 21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आला आहे. योग केवळ एक व्यायाम नसून ती एक निरोगी जीवनशैली असल्याचे मार्गदर्शन येथील योगगुरु गजानन चौधरी यांनी केले.
येथील भाजपा व राष्ट्रीय विघालयाच्या संयुक्त पुढाकारात रविवार, 21 जूनला योग दिवसानिमित्त राष्ट्रीय विघालयाच्या प्रांगणात सकाळी 6 वाजता योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योगासने व प्राणायाम नियमितपणे करून निरोगी जीवन कसे जगावे, याविषयी गजानन चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
 
 
या प्रसंगी भाजपा पुसद जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गजानन निचत, एसआयआर दिग्रस विधानसभा प्रमुख अरुण राठोड, मन की बात प्रमुख रमेश करवा, शहराध्यक्ष अभय इंगळे, योग दिनाचे संयोजक अमित चिद्दरवार, सहसंयोजक संजय घरत, संतोष मांजरखेडे, व्यापारी आघाडीचे सतिष बनगीनवार, व्हिजीएनटी शहराध्यक्ष विष्णू राठोड, राष्ट्रीय विघालयाच्या प्राचार्य मंगला मेश्राम, संजय तुपोने, भिमराव करे, संतोष मिश्रा, सोनाली लवाळे, दत्ता वंडाळे व इतर नागरिक उपस्थित होते.
दारव्हा : शहरीभागा सोबत ग्रामीण भागातील शाळा, विद्यालय, सामाजिक संस्थांमध्ये आंतराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तालुका क्रीडा संकूल, एडेड हायस्कूल, उमाबाई कणिकर कन्या विद्यालय, संकल्प क्रीडा मंडळ, मास्टर स्पोर्टस, यारी क्रिकेट ग्रुप, पतंजलीच्या माध्यमातुन साईमंदिर येथे पतंजली सखी मंच, योगा महिला ग्रुप, आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थांनचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, खेळाडू उपस्थित होते.
 
 
नेर न्यायालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा
नेर : आंतरराष्ट्रीय योगदीनाचे औचित्य साधून दिवानी व फौजदारी न्यायालय व तालुका विधी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने नेर येथील न्यायालयात योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी योग प्रशिक्षक वंदना दीपक ठोसर यांनी योगप्रात्याक्षिकासह योगाचे धडे दिले. आरोग्यासाठी योगाचे महत्त्व पटवून सांगितले. याप्रसंगी कनिष्ठ स्तर न्यायाधीश जीसी फुलझलके, अ‍ॅड. मनिषा पांगारकर, न्यायालयीन कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवानांनी सहभाग घेतला होता.
 
 
आंतरराष्ट्रीय योगादिन निमित्त योगशिबिर आयोजन
बोरी चंद्रशेखर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योगादिन निमित्त योगशिबिर आयोजन करण्यात आले होते. या शिबिराकरिता योगशिक्षक म्हणून दारव्हा येथील आर्ट ऑफ लिविंगचे अ‍ॅड. आशिष वानखडे यांनी योग, प्राणायाम व ध्यान या तिन्ही विषयावर मार्गदर्शन केले. योग शिबिराचे संयोजक डॉ. मनीष रेकवर, सहसंयोजक मनोज भाग्यवंत, सहसंयोजक अभी तिवारी, नंदलाल पालीवाल यांनी परिश्रम घेतले. प्रमुख अतिथी म्हणून किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पंजाब जाधव होते. तसेच राम कथा वाचक विशाल बडे यांनीही योग कसा जतन केला व आज 170 देशांमध्ये कसा पोहोचला याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मंडल अध्यक्ष राजेंद्र चिरडे, गजानन गुल्हाने, रत्नदीप पवार, पंकज बांगड, गजानन मुळे, रमेश जाधव, शिवा राजगुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
 
 
पंचशील विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
 
हदगाव,
पंचशील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक एनव्ही कदम व योग प्रशिक्षक डॉ. जयश्री पवार उपस्थित होते. त्यांनी आपले आरोग्य आणि योगा या विषयी मार्गदर्शन करून योग, प्राणायाम केल्याने आपले शरीर आरोग्याच्या दृष्टीने कसे तंदुरुस्त राहते हे पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन योग प्रशिक्षक राहुल वाठोरे यांनी केले. तर मुख्याध्यापक दस्तूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक जाधव, बेळकुंदे, परीक्षा प्रमुख ओमकार मुधोळ यांनी परिश्रम घेतले.