सेलू,
Cotton तालुयातील हिंगणी येथील थेट पणन परवानाधारक व्यापारी मे. सर्वज्ञ जिनिंग अॅण्ड प्रेसिंग (प्रवीण बोरकुटे इन्फ्राव्हेंचर्स प्रा. लि.) यांच्याकडून कापूस उत्पादक शेतकर्यांची बाऊन्स चेक आणि आरटीजीएसच्या नावाखाली कथित फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नागपूर व वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांचे लाखो रुपयांचे देयक अडकले असून, या प्रकरणाची सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीने गंभीर दखल घेत कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
सिंदी बाजार समितीचे सभापती केशरीचंद खंगार तसेच संचालक मंडळ यांनी पीडित शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहत सदर व्यापार्याविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. व्यापार्याची बँक गॅरंटी जप्त करून शेतकर्यांचे थकीत पैसे वसूल करण्यात येतील तसेच संबंधिताचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर शिफारस करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
या प्रकरणाबाबत Cotton बोलताना सभापती खंगार म्हणाले की, थेट पणन परवानाधारक व्यापार्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कृषी पणन मंडळ व पणन संचालनालयाची असली तरी शेतकर्यांना न्याय मिळवून देणे ही बाजार समितीची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे. यापूर्वीही याच व्यापार्याकडून एका शेतकर्याची थकीत रकम वसूल करून देण्यात यश आले होते. आता सर्व पीडित शेतकर्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी प्रशासनिक स्तरावर प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सदर व्यापार्याविरुद्ध बुटीबोरी व सिंदी रेल्वे पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी बाजार समिती पुढाकार घेणार असून शेतकर्यांना न्याय मिळेपर्यंत बाजार समिती कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सावंगी भानसोली येथील विजय गहरुले यांचा १.४२ लाख रुपयांचा धनादेश बाऊन्स झाल्याची तक्रार आहे. असोला येथील केतन सुपे यांनी आरटीजीएसच्या नावाखाली मूळ धनादेश परत घेतल्याचा आरोप केला आहे. सिंदी रेल्वे येथील देवेंद्र झिलपे यांचे २.३ लाख रुपये, तर कळमेश्वर तालुयातील तेलकामठी परिसरातील काही शेतकर्यांनीही देयके न मिळाल्याची तक्रार नोंदवली आहे.
शेतकर्यांना सावधगिरीचे आवाहन
भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीपासून Cotton बचाव करण्यासाठी शेतकर्यांनी व्यवहार करताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. आरटीजीएसचे आश्वासन मिळाले तरी रकम खात्यात जमा होईपर्यंत मूळ धनादेश परत देऊ नये, व्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवावीत आणि २४ तासांत पैसे न मिळाल्यास तत्काळ बाजार समितीकडे तक्रार करावी, असे आवाहर करण्यात आले आहे.