देवळी,
Deoli Yoga Day 2026, जागतिक योग दिनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी योग शिबिरे, प्रात्यक्षिके आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मात्र, देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांचा योग दिन विशेष आकर्षणाचा विषय ठरला आहे. पोहण्याच्या छंदातून त्यांनी मित्रांसह विहिरीत योगमुद्रा करून योगदिन साजरा केला.
रविवार २१ रोजी सकाळी आमदार राजेश बकाने यांनी देवळी शहरालगत पोहण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विहिरीवर आपल्या मित्रांसह जाऊन अनोख्या पद्धतीने योग दिन साजरा केला. विहिरीच्या खोल पाण्यात उतरून त्यांनी प्राणायाम, शवासन व विविध योगमुद्रा आपल्या सहकार्यांसह केल्या. पाण्यातील त्या चित्तथरारक योगमुद्रा पाहण्यासाठी उपस्थित नागरिकांसह रस्त्याने ये-जा करणारे अनेकजण थबकुन आपल्या आमदाराचे कौतुक करीत होते. प्रत्येक योगमुद्रेमध्ये आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि जीवनाविषयीची सकारात्मक दृष्टिकोन दिसून येत होता.
आ. बकाने यांचे विहिरीत पोहण्याचे नाते आजचे नाही तर लहानपणापासूनच त्यांना पोहण्याची आवड आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते आपल्या मित्रमंडळींसह या विहिरीवर पोहण्याचा आनंद घेत आले आहेत. सार्वजनिक जीवनात मोठे स्थान प्राप्त झाल्यानंतरही त्यांनी आपल्या बालपणीच्या छंदाचा कधीच विसर पडू दिला नाही. आमदारकीच्या जबाबदार्या सांभाळतानाही त्यांनी आपली जीवनशैली आणि साधेपणा कायम जपला आहे.
आजच्या योग दिनाने केवळ योगाचे महत्त्व अधोरेखित केले नाही, तर एक लोकप्रतिनिधी आपल्या मातीशी, आपल्या मित्रांशी आणि आपल्या जुन्या आठवणींशी किती घट्ट जोडलेला असू शकतो, याचेही दर्शन त्यांनी घडविले. पद मोठे झाले, जबाबदार्या वाढल्या, तरी मनातील साधेपणा आणि सामान्य माणसांशी असलेली नाळ कायम राहिली तरच नेतृत्त्व खर्या अर्थाने लोकांच्या मनात घर करते, याची प्रचिती आमदार राजेश बकाने यांच्या या कृतीतून आली.
विहिरीच्या निळ्याशार पाण्यात उमटलेल्या त्या योगमुद्रा केवळ शारीरिक कसरती नव्हत्या, तर त्या एका लोकनेत्याच्या साधेपणाचा, जिद्दीचा आणि जीवनावरील प्रेमाचा सुंदर आविष्कार होत्या. त्यामुळेच आजचा योग दिन देवळीकरांच्या स्मरणात केवळ का