नवी दिल्ली,
ind-vs-sl : श्रीलंकेत खेळली जात असलेली तिरंगी मालिका २०२६ अंतिम टप्प्यात पोहोचली असून, आता भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' हे संघ विजेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दांबुला येथील रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात, श्रीलंका 'अ' संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, भारतीय संघाने ५० षटकांत ९ गडी गमावून ३७७ धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने संघासाठी ९४ धावांची सर्वोच्च खेळी केली. त्याने केवळ २९ चेंडूंचा सामना केला आणि शतक पूर्ण करण्यापासून तो फक्त ६ धावा दूर राहिला. त्याने आपल्या खेळीत १० चौकार आणि ८ षटकार मारले. कर्णधार तिलक वर्माने ६७ धावांचे योगदान दिले.
इंडिया अ (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रुतुराज गायकवाड, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), सूर्यांश शेडगे, निशांत सिंधू, अनुकुल रॉय, विपराज निगम, अशोक शर्मा, यश ठाकूर
श्रीलंका अ (प्लेइंग इलेव्हन): निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, सदीरा समरविक्रमा, सहान अरचिगे (कर्णधार), रविंदू फर्नांडो, वानुजा सहान, मोहम्मद शिराझ, विजयकांत व्यासकांत, दुल्गा समुदीथा, विजयकांत व्यास