राळेगाव
International Yoga Day जागतिक योगदिनानिमित्त योग संवर्धन मंडळाच्या वतीने आरोग्यवर्धक व प्रेरणादायी विशेष व्याख्यानाचे आयोजन रविवार, 21 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता सांस्कृतिक भवनात करण्यात आले आहे. देवी सामका महिला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा वैद्य पंकज पवार हे या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार असून योगाच्या माध्यमातून आरोग्य, मानसिक शांतता आणि निरोगी जीवनशैली या महत्त्वपूर्ण विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत. आजच्या जीवनशैलीत ताणतणाव, असंतुलित आहार आणि बदलती जीवनपद्धती यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत योग, आयुर्वेद आणि सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोेचविण्याच्या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.