यवतमाळ,
International Yoga Day 2026 बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यवतमाळ जिल्ह्यात विविध ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला. या योगदिनात मंत्री, खासदार, आमदार, शासकीय अधिकारी, कर्मचारी, प्रतिष्ठीत नागरिक व विविध संघटनांनी सहभाग नोंदवला होता.
पोलिस प्रशासन, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिविंग, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, भाजपा यवतमाळ व मदन येरावार मित्रपरिवारद्वारे आयोजित योग दिवस कार्यक्रम रविवारी पोलिस कवायत मैदान येथे पार पडला.यावेळी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी डॉ. अशोक उईके यांनी, International Yoga Day 2026 नियमित योग करा आनंदी व निरोगी जीवन जगा असा संदेश दिला. सर्वांनी नियमित योग करावा व इतरांपासून करून घ्यावा यासाठी या योग आयोजन समितीचे समन्वयक राजू पडगिलवार यांनी सर्वांना संकल्प शपथ दिली. यावेळी योगशिक्षक म्हणून जनार्दन स्वामींचे महेश जोशी, पतंजलीचे संदीप खांदवे, शरद टेंभेकर, माया चव्हाण, प्रतिभा खसाळे, आर्ट ऑफ लिविंगकडून पूजा शेटे, प्रदीप उमरे, नीरज जयस्वाल, गजानन बिल्लावर यांनी योग प्रशिक्षण दिले.या कार्यक्रमात सूर्यनमस्कारात विक्रम केलेल्या ऋतुजा अमोल भोयरकर या दहा वर्षीय मुलीने योग प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक ज्ञानोबा देवकते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे, अवधूतवाडी ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित कदम, लोहारा पोलिस ठाण्याचे रोहित चौधरी, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉ. राजीव मुंदाणे, डॉ. समीर बेलूरकर, डॉ. मनोज येरावार, पतंजली योग समितीचे संजय चाफले, पंडित वारंगे, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे मनीष गुबे, कीर्ती राऊत, पूजा घोडे, योग नृत्य परिवाराचे संतोष वर्मा, माणिक मेहरे, सतीश बनगीनवार, क्रीडा भारती, आरोग्य भारती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, निमा संघटना, नंदानु योग केंद्र, शक्ती फाउंडेशन, भाजपा उडान महिला मंच, जिजाऊ फौंडेशन, शारीरिक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, मेरा युवा भारतचे अनिल ढेंगे, ज्ञानेश्वर सुरजुसे, शैला मिर्झापुरे, भाजपाचे नितीन गिरी, प्रमोद गुज्जलवार यांनी आयोजन समितीत सहभाग घेतला. योग साधनेनंतर योग नृत्य परिवाराने योगाचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे संचालन शंतनु शेटे यांनी केले. तर आभारप्रदर्शन कीर्ती राऊत यांनी केले. यावेळी 2 हजारावर साधकांनी सहभाग घेतला होता.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा
पतंजली योग समिती व महिला पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे नेर परसोपंत येथे 21 जून रोजी सकाळी आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. सुरेंद्र चिंद्दरवार, शोभा कोठारी, वैशाली मासाळ, अर्चना इसाळकर, रश्मी पेटकर, छाया नहाले, शरद राऊत यांनी योगदिनात सहभाग घेतला.आंतरराष्ट्रीय योग दिनात विविध आसनांचा अभ्यास करण्यात आला. दैनिक योगसाधना करण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन योग प्रशिक्षक तथा शिक्षक आचार्य लक्ष्मण आर्य यांनी केले. तर प्रात्यक्षिक रश्मी पेठकर व छाया नहाले यांनी केले. मोठ्या प्रमाणावर योगसाधकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.