नागपूर,
international yoga day आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पी. एम. जी. हॉल, माधवनगर येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. रमेशजी गौतम यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी सुनील बोक्षे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. परीक्षित जनाई व डॉ. अपर्णा जनाई उपस्थित होते. आरोग्य भारती महानगर, हनुमान मंदिर सेवा समिती, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, महिला प्रबोधन मंडळ, संजीवनी सर्वांगीण स्वास्थ्य केंद्र व पी. एम. जी. को-ऑप. हाऊसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात अभ्यंकर नगर, माधवनगर, डोंगरे लेआउट व श्रद्धानंद पेठ परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमात डॉ. रमेशजी गौतम यांचा सत्कार डॉ. रवींद्र क्षीरसागर, सुनील बोक्षे यांचा सत्कार अतुल गाडगे, डॉ. परीक्षित जनाई यांचा सत्कार श्रीकांत पांडे, डॉ. अपर्णा जनाई यांचा सत्कार विजया पाद्ये तसेच अनिल सूर पैठणकर यांचा सत्कार संध्या सैनिस यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सुलक्षणा देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिल्पा भांडारकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. रवींद्र क्षीरसागर, अनिल सूर पैठणकर, योगसाधक तृप्ती आकांत, संध्या सैनिस, नीलिमा पांडे, कांचन घागरेकर,अश्विनी गाडगे,शिल्पा भांडारकर,सुलक्षणा देशपांडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
सौजन्य: अभय चोरघडे, संपर्क मित्र