नागपूर,
bjp subhashnagar mandal भाजपा सुभाषनगर मंडळाच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त योग कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत योगाचे महत्त्व जाणून घेतले. यावेळी पतंजलीच्या योग शिक्षिका वनिता मुंगेलवार आणि माधुरी इंदूरकर यांनी उपस्थितांना विविध योगासने व प्राणायामाचे मार्गदर्शन केले. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक दिलीपजी दिवे, महामंत्री नितीन महाजन, प्रमोद व्यास, नगरसेवक संजयजी उगले, नगरसेविका अश्विनी जिचकार, नगरसेविका निधी तेलगोटे, भाजपा प्रदेश राज्य परिषद सदस्य विवेकजी तरासे, माजी नगरसेविका वर्षा ठाकरे, शाखा मुख्य शिक्षक शंकरराव पहाडे, महिला अध्यक्ष सपना हिरणवार, राम मुंजे, एंजिओ आघाडी अध्यक्ष राजू वाघ, व्यापारी आघाडी शहर महामंत्री अमित खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच रवी कुळकर्णी, मदन आळशी, अतुल गेडाम, राज मेश्राम, योगेश थापे, भूषणजी घुबरेले, पलक मोकदम, संगीता पाटील, श्रीखंडे, डॉ. आशुतोष लोणारे, प्रभाकर खानझोडे, अशोकजी वायकुळे, तुषार बुकने, संदीप घोडवैद्य, अनिल मुटे, रंजना मेश्राम, राजश्री आदमने आणि सुरेश विंचूरकर यांचीही उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे संयोजक विवेक मेंढी तर सहसंयोजिका डॉ. माधुरी इंदूरकर होत्या. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
सौजन्य: विवेक मेंढी, संपर्क मित्र