निरोगी आरोग्यासाठी करा योग

डॉ. अखिलेश पेशवे यांचे प्रतीपादन

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University "निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने योग जीवनशैलीचा भाग बनवावा," असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे यांनी केले. विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने रावसाहेब डी. लक्ष्मीनारायण क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
 
 
International Yoga Day Nagpur University, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University
 
 
प्रमुख अतिथी म्हणून ब्रिगेडियर सुहास कुळकर्णी, सुजाता कुळकर्णी, अधिसभा सदस्य डॉ. संजय चौधरी, प्राचार्य विजय दातारकर, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ. संभाजी भोसले, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ‌. अखिलेश पेशवे यांनी सर्व उपस्थितांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक करताना डॉ. संभाजी भोसले यांनी योग प्रकार खेळाडूंसह सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. योग केवळ आसन नसून जीवनशैली असल्याचे ब्रिगेडियर सुहास कुळकर्णी यांनी सांगितले. यावेळी कुलकर्णी दांपत्यांनी योग प्रात्यक्षिक करताना पश्चिमोतानासन, व्याघ्रासन, अर्ध मच्छिंद्रसन, ताडासन, त्रिकोणासन, सर्वांगीण सूर्यनमस्कार, भ्रामरी, प्राणायाम, हास्यासन व ओंकार आदी योगाचे विविध प्रकार प्रात्यक्षिकातून समजावून सांगितले.या उपक्रमात विविध क्रीडा संघ, शिक्षक, विद्यार्थी आणि खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले.