वर्धा,
International Yoga Day Wardha योगा ही भारताची पारंपरिक उपचार पद्धती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला योगाचे महत्त्व पटवून दिले आणि या उपचार पद्धतीला जागतिक स्तरावर मान्यता आणि नावलौकिक प्राप्त झाला. आज जगातील बहुतांश देशात योगाचा दैनंदिन जीवनात उपयोग केला जातो, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
आयटीआय टेकडी जवळील तालुका क‘ीडा संकुलाच्या निसर्गरम्य परिसरात जिल्हा प्रशासन, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क‘ीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, माय भारत केंद्र, पतंजली योग समिती व विविध शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, संघटनांच्या संयुत वतीने जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक‘मात पालकमंत्री डॉ. भोयर बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक सौरभ अग‘वाल, अतिरित जिल्हाधिकारी संजय तेली, अतिरित मु‘य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे, जिल्हा क‘ीडा अधिकारी आशा मेश्राम, अशोक कलोडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागकि, महिला, विद्यार्थी मोठ्या सं‘येने उपस्थित होते.
देशात असं‘य वर्षांची परंपरा लाभलेल्या योगाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटलेले आहे. ही केवळ उपचार पद्धतीच नाही तर तंदुरुस्त शरीर, आरोग्य व आनंदाचा मंत्र देखील आहे. काही संस्था, संघटना योगाच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी झटत आहे. प्रशासनाने देखील जनजागृती करून योगाचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी काम करण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने प्रत्यक्ष जीवनात जास्तीत जास्त योगाचा अवलंब करणे आवश्यक आहे. यावर्षी पाणी संकट राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रत्येकाने आतापासूनच पाण्याची बचत व त्यादृष्टीने नियोजन करावे, असेही पालकमंत्री डॉ.भोयर म्हणाले.
डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी सामुहिक योगासने केली. पतंजली योग समितीचे दामोधर राऊत, मोहन काळे, प्रशांत सावरकर यांनी योगांचे महत्त्व पटवून प्रात्यक्षिकाद्वारे योगासने करून घेतली