नागपूर,
lic housing finances foundation एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड चा ३७वा स्थापना दिन १९ जून २०२६ रोजी नागपूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कंपनीच्या क्लस्टर आणि एरिया कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात कंपनीच्या ३७ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यात आला. तसेच कार्यकाळातील महत्त्वपूर्ण टप्पे, उपलब्धी आणि भविष्यातील योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या विशेष कार्यक्रमात क्लस्टर मुख्य प्रबंधक सुंदरम अय्यर, एरिया प्रबंधक आनंद कापसे यांच्यासह अन्य अधिकारी, मार्केटिंग फोर्स, LICHFLFSL टीम तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कंपनीच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले. स्थापना दिनानिमित्त गेट-टुगेदर आणि स्वरुची भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमुळे सर्वांना एकत्र येऊन संवाद साधण्याची आणि कंपनीच्या प्रवासाची उजळणी करण्याची संधी मिळाली.
गेल्या ३७ वर्षांत एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने गृहवित्त क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत कंपनीने ग्राहककेंद्री सेवा अधिक सक्षम केल्या आहेत. आज कंपनीकडे ११ हजारांहून अधिक मार्केटिंग फोर्स, २५०० कर्मचारी, ३०३ मार्केटिंग कार्यालये आणि ३९ क्लस्टर कार्यालयांचे मजबूत नेटवर्क आहे. यावेळी कंपनीने भविष्यातील योजनांचीही माहिती दिली. नव्या योजना, डिजिटल ॲप, डिजिटल कागदपत्र प्रक्रिया, डिजिटल पेमेंट सुविधा आणि बँकिंग आधारित कर्जसेवा यांसारख्या उपक्रमांमुळे ग्राहकांना अधिक सुलभ आणि जलद सेवा मिळणार असल्याचे सांगण्यात आले. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा ३७वा स्थापना दिन हा कंपनीच्या प्रगतीतील महत्त्वाचा टप्पा ठरला असून, यानिमित्त भविष्यातील वाटचालीचा नवा आराखडाही समोर आला.
सौजन्य: आशुतोष ठोंबरे, संपर्क मित्र