धर्मालाच आपले प्रेम बनवा : मुनिश्री विनंदसागर

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
आर्वी, 
munishri-vinandsagar : नीतीग्रंथाना आपला खरा मित्र बनवा. कारण जो व्यती नीती, धर्म आणि सदाचार यांचा अभ्यास करतो, त्याच्या जीवनात विवेक, संयम आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते. प्रेम करायचेच असेल तर धर्मावर करा, असे मार्गदर्शन मुनिश्री विनंदसागर यांनी केले.
 

jik 
 
 
 
स्थानिक पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर तसेच आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात उच्चारणाचार्य युवा संस्कार प्रणेते मुनिश्री विनंदसागर महाराज प्रवचनात ते बोलत होते.
 
 
मुनिश्री विनंदसागर पुढे म्हणाले की, जगातील सर्व नाती बदलणारी आहेत. परंतु, धर्म, सत्य, सदाचार आणि आत्म्याशी असलेले नाते शाश्वत आहे. मनुष्याने राग-द्वेषापासून दूर राहून आत्मकल्याणाच्या मार्गावर प्रेम करावे. प्रत्येकाने रात्रंदिवस आपल्या आत्मस्वरूपाचे, पंचपरमेष्ठींचे, अहिंसा, क्षमा, सत्य, संयम आणि मोक्षमार्गाचे चिंतन करावे. असे चिंतन मनाला शांती, जीवनाला योग्य दिशा आणि आत्म्याला उन्नतीकडे नेणारे ठरते. तसेच नवकार मंत्राचे अखंड स्मरण करावे आणि क‘ोध, मान, माया व लोभ या कषायांचा त्याग करून आदर्श जीवन जगण्याचे आवाहनही त्यांनी केले. जैन समाजातील महिला-पुरुष मोठ्या सं‘येने उपस्थित होते.