वर्धा,
md-seized : शहरातील इदगाह ग्राउंड परिसरात पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात कारवाई करत शेख अमीर शेख हमीद (३३) रा. आनंदनगर याला अटक केली. या कारवाईत ३.८७ ग्राम एमडी (मेफेड्रान) हा अमली पदार्थ, दोन मोबाईल व रोख रकम असा ५१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून १९ हजार ३५० रुपये किंमतीचा एमडी मेफेड्रान, दोन मोबाईल फोन व रोख रकम हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान आरोपीने हा अमली पदार्थ रोशन सहारे रा. आनंदनगर, वर्धा याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली असून संबंधित आरोपी सध्या फरार आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. न्यायालयात हजर केले असता शेख अमीर शेख हमीद यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड व त्यांच्या पथकाने पार पाडली.