अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur MD drug case गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तांडापेठ परिसरातून २० ग्रॅम एम.डी. पावडरसह दोन तस्करांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शेख इकराम शेख मुजफ्फर (२७, खरबी, वाठोडा) आणि प्रवीण उर्फ टेम्प्या गणेश निमवले (३१, तांडापेठ, पाचपावली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार सोहेल उर्फ गोलू खान (मानेवाडा) हा फरार आहे.
रविवारी पहाटेच्या सुमारास पोलिस पथक गस्त घालत होते. पोलिसांना तांडापेठ येथील आकाश पान शॉपसमोर दोन आरोपी दुचाकीसह संशयास्पदरित्या उभे दिसले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे २ लाख रुपायंची २० ग्रॅम एम.डी. पावडर सापडली. कारवाईत पोलिसांनी पोलिसांनी एम.डी. पावडर, २ मोबाईल आणि दुचाकी जप्त केली. दोन्ही आरोपी हे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ड्रग्सची विक्री Nagpur MD drug case करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरूद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. आरोपींना जप्त मुद्देमालासह पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.