यवतमाळ
Nasha Mukt Bharat Abhiyan सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाच्या वतीने राबवण्यात येणाèया ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त 17 ते 26 जून दरम्यान सामाजिक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अभियानात सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शासकीय व अनुदानित वसतीगृहे, व्यसनमुक्ती केंद्रे, सामाजिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकाèयांनी केले आहे. सर्व शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना व नागरिकांनी राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून नशामुक्त भारताच्या निर्मितीस हातभार लावण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांनी केले आहे.