नवविवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

-तीन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद -पती, सासू व सासऱ्यांना अटक

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
commits-suicide : सिसोदिया लेआउटमधील 24 वर्षीय साक्षी अभिषेक उर्फ अभय चौधरी हिने शनिवारी दुपारी तिच्या घरातील ग्रीलला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी साक्षीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी पती, सासू, सासरे व नणंदे विरोधात गुन्हा दाखल करून पती, सासू व सासèयाला रविवार, 21 जून रोजी अटक केली.
 
 
 
commits-suicide
 
 
 
कोसदनी येथील शिवाजी भावराव ठाकरे यांच्या तिसèया क्रमांकाची मुलगी साक्षी हिचा विवाह आर्णी येथील अभिषेक उर्फ अभय रामेश्वर चौधरी याच्याशी 25 जानेवारी 2026 रोजी दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिरात झाला होता.
 
 
काही दिवस सुखाने राहिल्यानंतर पती अभय, सासू संगीता, सासरे रामेश्वर व नणंद शिवानी शुभम मेघे हे हुंड्यासाठी साक्षीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याच्या आरोप शिवाजी ठाकरे यांनी तक्रारीत केला. 20 जानेवारी रोजी, साक्षीने सिसोदिया लेआउटमधील तिच्या घरातील ग्रीलला ओढणी बांधून आत्महत्या केल्याचा सासरच्यांनी फोनवरून कळवील्याचे सांगितले.
 
 
वडील व कुटुंबीयांना रामेश्वर चौधरी यांच्या घरी साक्षीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तसेच तीच्या शरीराच्या काही भागांवर मारहाणीच्या खुणा दिसल्या. याप्रकरणी कोसदणीचे नागरिक व मृताचे नातेवाईकांनी आधी आरोपीला अटक करण्यास सांगितले. मृतदेहाजवळ सापडलेले पत्र दाखवून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी नागरिकांनी रस्ता रोखो आंदोलन केले.
 
 
आर्णी पोलिसांनी साक्षीचा पती अभिषेक उर्फ अभय चौधरी, सासरे रामेश्वर विष्णू चौधरी, सासू संगीता रामेश्वर चौधरी व नणंद शिवानी शुभम मेघे यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 80 (2) अन्वये गुन्हा दाखल केला. पती व सासèयाला रात्रीच अटक केली, तर सासूला रविवारी अटक करण्यात आली. तिघांना रविवारी आर्णी न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते.
 
 
याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद पराडकर, जमादार संदीप ढेंगे तपास करत आहेत.
अंतिम संस्कारांसाठी मृतदेह कोसदणी येथे नेण्यात आला होता. तेथे मोठ्या संख्येने लोकांच्या उपस्थिती होती. या घटनेच्या निषेधार्थ कोसदणी येथील शेकडो पुरुष, महिला व कुटुंबीयांनी आर्णी महामार्ग काही काळासाठी अडवला होता. त्यानंतर शिवनेरी चौकातून मोर्चा काढण्यात आला. पोलिस प्रशासनाने आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.