गांजा तस्कराच्या आवळल्या मुसक्या

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
पुलगाव,
Pulgaon ganja seizure, अमली पदार्थ विरोधी मोहिमेंतर्गत पुलगाव पोलिसांनी कारवाई करत रामनगर वार्ड परिसरातून गांजा विक‘ी करणार्‍यास अटक केली. कारवाईत ६०८.९६ ग‘ॅम गांजा, मोबाईल जप्त केला. या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपीस ओडिशा राज्यातून गांजाचा पुरवठा होत असल्याचे चौकशीत पुढे आले आहे.
 

Pulgaon ganja seizure, 
 
 
पोलिस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांना गांजाबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या चमूने पुलगाव येथील रामनगर वार्ड येथील प्रफुल्ल लोणकर (४५) याच्या घरी धाड टाकली. घराची झडती घेतली असता एका पिशवीत मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. ६०८.९६ ग‘ॅम गांजा व मोबाईल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणातील आरोपीविरुद्ध एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सदाशिव ढाकणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मदनकर, पोलिस उपनिरीक्षक शहाजी घोडके, विनोद रघाटाटे, राजू वैद्य, संदीप बोरबन, सोमेश गंथाडे, अजय अनंतवार, गोपाल बावनकर, कुणाल हिवसे यांनी केली.