कमाईत रणवीर खरा ‘धुरंधर’

सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
मुंबई
dhurandhar ranveer अभिनेता रणवीर सिंह त्याच्या ‘धुरंधर’ चित्रपट मालिकेच्या यशानंतर भारतातील सर्वात महागडे स्टार बनला आहे. रणवीरने या चित्रपटाच्या दोन्ही भागांतून एकूण 325 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याने चित्रपटासाठी कोणतीही निश्चित फी घेतली नव्हती, तर प्रॉफिट शेअरिंग (नफ्यात वाटा) चा पर्याय निवडला होता. ‘धुरंधर’ने जगभरात 3100 कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन केले आहे.
 
ranveer 
dhurandhar ranveer या कमाईसह रणवीर सिंहने शाहरुख खान, रजनीकांत आणि अल्लू अर्जुन यांसारख्या मोठ्या स्टार्सच्या कमाईचा विक्रम मोडला आहे. रणवीर सिंहने ’धुरंधर’ चित्रपटासाठी आपली नियमित फी सोडली होती. त्याने निर्मात्यांसोबत नफ्यात वाटा निश्चित केला होता. जेव्हा चित्रपटाचे बजेट वाढले, तेव्हा रणवीरने स्वतःही या प्रकल्पात पैसे गुंतवले होते. चित्रपटाच्या कमाईनंतर आता त्याला थिएटर कलेक्शन, डिजिटल, सॅटेलाइट आणि म्युझिक राइट्सच्या वाट्यापोटी 325 कोटी रुपये मिळाले आहेत.
dhurandhar ranveer रजनीकांत, शाहरुख खानला मागे टाकले
रणवीर सिंहपूर्वी भारतात सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत यांच्या नावावर होता. त्याने 2024 मध्ये आलेल्या ‘जेलर’ चित्रपटासाठी 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. तर, बॉलिवूडमध्ये हा विक्रम शाहरुख खानच्या नावावर होता, ज्याने 2023 मध्ये ‘पठाण’ आणि ‘जवान’ चित्रपटांमधून सुमारे 200-200 कोटी रुपये कमावले होते.
dhurandhar ranveer यांच्याशिवाय अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2’ आणि प्रभासने ‘कल्की 2898 एडी’ साठी 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त मानधन घेतले होते. आता रणवीर 325 कोटी रुपयांसह सर्वात पुढे निघाला आहे.