एकूण निकाल 94.59 टक्के

चार विभागांचा 100 टक्के निकाल

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा

राळेगाव,
Sai Polytechnic किन्ही (जवादे) येथील साई पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आयोजित उन्हाळी2026 शैक्षणिक परीक्षेत पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेची उज्ज्वल व गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची कामगिरी करत संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची साक्ष पुन्हा एकदा दिली आहे.
 

Sai Polytechnic Kini Jawade 
यंदाच्या परीक्षेत संस्थेचा एकूण निकाल 94.59 टक्के लागला असून, कॉम्प्युटर अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांचा 100 टक्के निकाल लागला आहे. सर्व विभागांतील विद्यार्थ्यांनी उच्च गुण प्राप्त करून संस्थेच्या यशात मोलाची भर घातली आहे.
शाखानिहाय गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर शाखेत श्रुती मिसाळ हिने 86.12 टक्के गुण मिळवत शाखेत प्रथम क्रमांक पटकावला. इलेक्ट्रिकल शाखेत निरंजन चव्हाण यांनी 84.42 टक्के, सिव्हिल शाखेत युगंधर टाले यांनी 82.67 टक्के, आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाखेत कृष्णा शर्मा यांनी 80.12 टक्के, तर मेकॅनिकल शाखेत साहिल निखाते यांनी 71.90 टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शाखानिहाय निकालामध्ये कॉम्प्युटर 100 टक्के, इलेक्ट्रिकल 100 टक्के, सिव्हिल 95 टक्के, आर्टिफिशियल इंटेलिजन्स 100 टक्के आणि मेकॅनिकल 80 टक्के असा उल्लेखनीय निकाल लागला आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिशम, शिक्षकांचे गुणवत्तापूर्ण अध्यापन, नियमित मार्गदर्शन तसेच संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सुविधा यांचा मोठा वाटा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे संस्थापक संजय काकडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, तसेच शिक्षकांचे अभिनंदन करून भविष्यातही अशीच कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य नितीन ठमके यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत शिक्षकांच्या समर्पित कार्याचे विशेष अभिनंदन केले. या उल्लेखनीय निकालामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, साई पॉलिटेक्निकने गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील आपले वेगळे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.