सावंगीतील कुंटणखान्यावर धाड; एकास अटक

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
वर्धा,
Savangi Meghe police action सावंगी (मेघे) परिसरातील ‘कृष्णाई’ नामक इमारतीतील एका सदनिकेत सुरू असलेल्या देहव्यापाराचा पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षच्या चमूने भंडाफोड केला. या ठिकाणाहून पोलिसांनी एकाला अटक केली असून देहव्यापारासाठी आणलेल्या छत्तीसगड राज्यातील एका महिलेची सुटका केली. ही कारवाई २० रोजी दुपारी बनावट ग‘ाहक पाठवून केली. राजू उर्फे नीलेश आदेवार (२१) रा. तुकाराम वार्ड रामनगर वर्धा असे अटक केलेल्याचे नाव असून या प्रकरणातील मु‘य आरोपी असलेली मुस्कान उर्फ शबनम नामक महिला फरार आहे.
 

Savangi Meghe police action 
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्धेतील मुस्कान उर्फ शबनम नावाची महिला राज्यासह परराज्यातील मुलींना पैशाचे आमिष देऊन त्यांना सावंगी (मेघे) परिसरातील सदनिकेत बोलावून देहव्यापार करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग‘वाल यांच्या निर्देशाप्रमाणे बनावट ग‘ाहक पाठविला. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. कृष्णाई नामक इमारतीच्या तिसर्‍या माळ्यावरील १३ क‘मांकाच्या सदनिकेत हा देहव्यापाराचा व्यवसाय सुरू होता. पोलिसांना यावेळी राजू उर्फ नीलेश आदेवार हा मिळून आला. सोबतच एका महिलेला ताब्यात घेऊन तिची सुटका केली. सदर महिलेची तिच्या एका मैत्रिणीच्या माध्यमातून मुस्कान उर्फ शबनम हिच्याशी ओळख झाली. कामाच्या निमित्ताने महिलेला मुस्कानने वर्धा येथे बोलावले होते. पण, नंतर तिला देहव्यापाराच्या दरीत ढकलल्याचे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले. या सदनिकेतून पोलिसांनी ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग‘वाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषसिंह ठाकूर, दिवाकर परिमळ, अमर लाखे, संजयसिंग सूर्यवंशी, चंद्रकांत बुरगे, संजय राठोड, नितेश मेश्राम, नवनाथ मुंडे, शवाना शेख यांनी केली.
‘मुस्कान’चे नेटवर्क मोठे
या प्रकरणातील मु‘य आरोपी असलेली मुस्कान उर्फ शबनम नामक महिलेचे नेटवर्क चांगलेच मोठे असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. ती राज्यातील आणि राज्याबाहेरील महिलांना वर्धेत बोलावून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत होती. ती पोलिसांना गवसल्यावर आणखी काही मोठ्या धकादायक बाबी पुढे येण्याची शयता आहे.