रेवती सुळे यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला शाहरुख खानची रंगत

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
मुंबई
Revati Sule wedding राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून, या सोहळ्याला मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभत आहे. प्री-वेडिंग कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
 

Supriya Sule daughter wedding, Revati Sule wedding 
या सोहळ्यातील सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे तो बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा उपस्थितीतील डान्स व्हिडिओ. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खान रेवती सुळे आणि त्यांच्या होणाऱ्या पतीसह डान्स करताना दिसत आहे. कार्यक्रमात त्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले असून, त्याच्या उत्साही सहभागामुळे वातावरण अधिकच रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले.
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये शाहरुख Revati Sule wedding खान ‘कोई मिल गया’ या लोकप्रिय गाण्यावर थिरकताना दिसतो. त्याचा हा उत्साही अंदाज आणि स्टेजवरील सहज वावर यामुळे उपस्थितांनीही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला गायक राहुल वैद्य याचीही उपस्थिती होती. त्याने आपल्या गायनाने सोहळ्याची रंगत आणखी वाढवली.दरम्यान, या व्हायरल व्हिडिओंवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असून, चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.शाहरुख खानच्या कामकाजाबाबत बोलायचे झाल्यास, तो सध्या दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या ‘किंग’ या आगामी अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सुहाना खान, अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, अर्शद वारसी आणि राणी मुखर्जी यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट 24 डिसेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबात सुरू असलेल्या या लग्नसोहळ्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही उत्सुकता निर्माण झाली असून, रेवती सुळे यांच्या विवाहाबाबतची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.