नागपूर,
the master storyteller madgulkar महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘चिटणवीस सेंटर’तर्फे विशेष कथा-कथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण महाराष्ट्राचे वास्तववादी चित्रण, मराठी साहित्य, नाट्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबईच्या मंजिरी देवरास माडगूळकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आणि त्यांच्या साहित्याचा समृद्ध वारसा उलगडून सांगणार आहेत.
स्थळ : चिटणवीस सेंटर, मिमोसा हॉल
दिनांक : रविवार, २१ जून
वेळ : सायंकाळी ६.०० वाजता
साहित्यप्रेमींसाठी प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
सौजन्य: योगिता चकोले, संपर्क मित्र