पारवा,
Waghadi River ढग आहेत, पण पाऊस मात्र रुसलाय, पारव्याच्या वाघाडीचा केवळ फोटोच आता हसलाय..! आज 21 जून आला, तरीही घाटंजी तालुक्यात पावसाने दडी मारली आहे. पारवा येथील वाघाडी नदीचे हे कोरडे पात्र फोटोग्राफरसाठी एक सुंदर ‘अँगल’ असू शकते, पण बळीराजासाठी ती चिंतेची लकेर आहे. पाऊस नसल्यामुळे नदी पूर्ण कोरडी झाली आहे. केवळ फोटोपुरतेच सुंदर दिसणारे हे पात्र आता लवकरात लवकर पाण्याने दुथडी भरून वाहावे, हीच प्रत्येक पारवावासी आणि शेतकèयांची प्रतीक्षा आहे.