वर्धा,
Zilla Parishad schools जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा या हेतूने जिल्ह्यातील जिपच्या १७ शाळा आदर्श करण्याचे शासन स्तरावरून निश्चित करण्यात आले आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यावर संबंधित शाळांमध्ये विविध भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याने त्या शाळांचा चेहरा मोहरा बदलणार आहे.
पहिली ते दहावीच्या शाळांतील शैक्षणिक दर्जा वाढावा तसेच तेथील विद्यार्थ्यांना सुसज्ज संगणक कक्ष, ग‘ंथालय, स्वच्छतागृह, किचन शेड, संरक्षण भिंत आदी भौतिक सुविधा मिळाव्या यासाठी जिल्ह्यातील १७ शाळा आदर्श करण्याची मंजुरी शासनाकडून मिळाली आहे. यात देवळी तालुयातील शिरपूर येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळा व विजयगोपाल येथील जि. प. प्राथमिक शाळा, सेलू तालुयातील केळझर जि. प. प्राथमिक शाळा (मुलांची), वर्धा येथील बोरगाव मेघे येथील जि. प. प्राथमिक कन्या शाळा, पिपरी येथील जि.प. प्राथमिक शाळा, सावंगी मेघे येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, तालुयातील महाकाळ येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळा, पवनार येथील जि. प. प्राथमिक शाळा (मुलींची), कुरझडी (जा.) येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, हिंगणघाट तालुयातील पिपरी येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळा, समुद्रपूर येथील जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा, सेलू तालुयातील हिंगणी येथील जि. प. प्राथमिक शाळा व आकोली येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळा तसेच कान्हापूर येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळा, आर्वी तालुयातील काचनूर येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळा, आष्टी तालुयातील बोरगाव येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळा, कारंजा तालुयातील गवंडी येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेचा समावेश आहे.
या शाळांमध्ये विविध भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी जिपच्या शिक्षण विभागाने शासनाकडे ४.६८ कोटींचा प्रस्ताव पाठविला असून लवकरच या प्रस्तावाला शासनाकडून हिरवी झेंडी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
यापूर्वी ८ शाळा झाल्या आदर्श
सन २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील १७ शाळा आदर्श करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. निधी प्राप्त झाल्यावर विविध भौतिक सुविधा या शाळांमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तर २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील ८ शाळा आदर्श करण्यात आल्या होत्या. त्यावेळी संबंधित शाळा आदर्श करण्यासाठी शासनाने प्रत्येकी १ कोटींचा निधी दिला होता. यापूर्वी आदर्श झालेल्या शाळांत आर्वी तालुयातील रसुलाबाद येथील जि. प. उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा, देवळी तालुयातील पी. एमश्री. जि. प. उच्च प्राथमिक शाळेचा समावेश आहे.