कोण आहे लेबनॉनचा हिजबुल्लाह?; अमेरिका-इराण करारावर धोक्याचे सावट

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
lebanons-hezbollah : मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लेबनॉनमधील शक्तिशाली शिया सशस्त्र संघटना हिझबुल्लाहमुळे अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चेवर मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 
 
WAR
 
 
हिझबुल्लाह ही लेबनॉनमधील प्रभावशाली राजकीय आणि सशस्त्र संघटना मानली जाते. 1980 च्या दशकात इस्रायलविरोधी प्रतिकार चळवळ म्हणून तिची स्थापना झाली. कालांतराने या संघटनेने लेबनॉनच्या राजकारणात आणि सुरक्षाव्यवस्थेत मोठा प्रभाव निर्माण केला. इराणकडून या संघटनेला आर्थिक, लष्करी आणि धोरणात्मक पाठबळ मिळत असल्याचे मानले जाते.
 
सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव कमी करण्यासाठी विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. मात्र हिझबुल्लाहकडून कोणतीही आक्रमक कारवाई झाल्यास या चर्चेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. विशेषतः इस्रायल-लेबनॉन सीमावर्ती भागातील वाढता संघर्ष संपूर्ण मध्य पूर्वेला अस्थिर करू शकतो.
 
तज्ज्ञांच्या मते, हिझबुल्लाहचा कोणताही मोठा हल्ला किंवा प्रत्युत्तरात्मक कारवाई परिस्थिती अधिक बिघडवू शकते. अशा वेळी अमेरिका, इराण आणि इस्रायल या तिन्ही देशांतील संबंध पुन्हा ताणले जाण्याची शक्यता आहे.
 
सध्या संपूर्ण जगाचे लक्ष मध्य पूर्वेतील घडामोडींवर लागले आहे. हिझबुल्लाहची पुढील भूमिका काय असेल आणि अमेरिका-इराण चर्चेचे भवितव्य कोणत्या दिशेने जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.