बुलढाणा,
world-yoga-day : जागतिक योगदिनानिमित्त धाड येथे विविध क्षेत्रातील योगप्रेमींनी एकत्र येऊन योगसमिती स्थापन करून धाड येथे आरोग्य भारतीचे राष्ट्रीय महासचिव डॉ. सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलासाठी व पुरुषांसाठी योग दिवस दि. २१ जून रोजी साजरा करण्यात आला. या योगवर्गासाठी शिक्षक श्रीपाद कलंत्री व सीमा कलंत्री उपस्थित होत्या.
स्थानिक डॉक्टर असो. डॉ. गणेश मांटे, व्यापारी असो. किरण सरोदे, राष्ट्रवादी पक्षाचे दिंगबर जाधव, भाजपचे देविदास जाधव, अनिल कुटे, बबलू वाघुर्डे, केमीस्ट असो. सुशील जोशी, योग विद्यालयाचे शिक्षक अभिनव बोर्डे, मारोती संस्थानचे रविंद्र ठाकरे, बालाजी संस्थाचे तेजराव मोहीते, रा. स्व. संघाचे योगेश कुळकर्णी, वैभव देशपांडे, रवि जोशी, विहिपचे नाना माळोदे, प्रवीण मोहीते उपस्थित होते. श्री मारोती संस्थान धाड येथे पुरुष व महिला व विद्यार्थी तसेच श्री बालाजी मंदीर येथे महिलांसाठी योग वर्ग संपन्न झाला.
स्वस्थ जीवन शैली व नियमित योग साधना याद्वारे संपूर्ण निरोगी, निरामय जीवन जगण्यासाठी साह्य होते. यांचे संपूण मार्गदर्शन योग साधकांना यावेळी मिळाले. या योगवर्गाला धाड येथील योगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.