हावरापेठ मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे योग दिन उत्साहात साजरा

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
नागपूर,
havrapeth morning walk group हावरापेठ मॉर्निंग वॉक महिला मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनाचे औचित्य साधून सद्भावना नगर येथील बगीच्यात सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले. हावरापेठ मॉर्निंग वॉक ग्रुपमधील महिला वर्षभर दररोज पहाटे सद्भावना नगर येथील बगीच्यात नियमित वॉकिंगसाठी एकत्र येतात. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त त्यांनी सामूहिक योग करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
 
walk group
 
यावेळी योगाचे आरोग्यदायी फायदे, मानसिक स्वास्थ्य आणि दैनंदिन जीवनातील उपयुक्तता यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “बना योगी आणि सदैव रहा निरोगी” हा संदेश देत योगामुळे जीवनात सकारात्मक बदल घडतो आणि आरोग्यसंपन्न जीवन जगता येते, असे सांगण्यात आले. मार्निंग वॉक ग्रुपच्या कल्पना तितरे यांनी योग दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच सहभागी महिलांनी योगामुळे झालेल्या शारीरिक आणि मानसिक फायद्यांचे अनुभवही मांडले. या उपक्रमात माधुरी मेहर, कल्पना तितरे, मेघा वझेकर, वाढे ताई, रसिका बांते, गोडबोले ताई, संगीता मोहरले आणि गीता खांडे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र