उदय नगरमध्ये योगदिन उत्साहात

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
नागपूर,
yoga day उदय नगर येथील लक्षवेध योगनृत्य परिवारातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी परिवारातील सर्व सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत योगाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर आदरणीय योगेशजी बन तसेच महिला संचालक सदस्य चंद्रकला मेश्राम यांनी योग दिनाचे महत्त्व, योगाचे आरोग्यासाठी असलेले फायदे आणि दैनंदिन जीवनातील योगाची गरज याबाबत विशेष मार्गदर्शन केले.
 
yoga day
 
यावेळी संचालक सदस्य इनकाने, योग प्रशिक्षक अजय चव्हाण, तसेच कल्याणी येरणे, वनिता चंद्रयान आणि रिता वर्मा यांच्या उपस्थितीत विविध योगासने आणि प्राणायाम सत्र घेण्यात आले. तसेच पतंजली योग परिवाराशी जोडलेले भुजाडे यांचीही विशेष उपस्थिती लाभली. सर्व सदस्यांनी योगाभ्यासात सक्रिय सहभाग घेत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्वादिष्ट नाश्त्याचे आयोजन करण्यात आले. या यशस्वी आयोजनासाठी सर्व सदस्यांचे आभार मानण्यात आले. उपस्थित राहून योग दिनाला मान दिल्याबद्दल सर्व सदस्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
सौजन्य: श्रीकांत पावनीकर, संपर्क मित्र