भगवान नगर ज्येष्ठ नागरिक मंडळात योग मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
नागपूर,
yoga guidance program भगवान नगर ज्येष्ठ नागरिक मंडळात योग मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात योगगुरू विकास बोरगावकर यांनी उपस्थितांना विविध योगासने करून घेतली तसेच त्यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. योगामुळे शरीर आणि मन निरोगी राहण्यास कसा फायदा होतो, तसेच दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व काय आहे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
 
yoga guidance program
 
हा कार्यक्रम विलास सोनारे यांच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी चहापानाचे आयोजन करण्यात आले. yoga guidance program ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी “योग करा, मस्त रहा, स्वस्थ रहा, निरोगी रहा” असा संदेश देण्यात आला.
सौजन्य: सुहास खरे, संपर्क मित्र