आरोग्य संकल्प अभियानाचा 2,084 रुग्णांनी घेतला लाभ

संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा,
sanjay-rathod : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त माँ आरोग्य सेवा समिती, दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरोग्य संकल्प अभियान’ रविवारी पार पडले. या अभियानात 2 हजार 84 रुग्णांनी तपासणी करण्यात आली.
 

y22Jun-Aarogya 
 
 
 
शिबिराचे उद्घाटन संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पश्चिम विदर्भ सहसंपर्कप्रमुख पराग पिंगळे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधर मोहोड, मार्गदर्शक जीवन पाटील, जिल्हाप्रमुख यशवंत पवार, दारव्हा नगर परिषद अध्यक्ष सुनील चिरडे, उपाध्यक्ष दीपा सिंगी, तालुकाप्रमुख मनोज सिंगी, शहरप्रमुख राजू दुधे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
डॉ. सुभाष ढोले, डॉ. सुखदेव राठोड, बाजार समिती सभापती सुभाष राठोड, उपसभापती सुशांत इंगोले, नप सभापती एकनाथ माहुरकर, नप सभापती प्रकाश दुधे, गटनेते श्रीकृष्ण शेलोकर, नप सभापती वैशाली खाटिक, उपसभापती जमिला चौधरी, गणेश भोयर, स्वीय सहायक चेतन करोडदेव, घनश्याम नगराळे, दारव्हा शहर समन्वय समिती विकास आघाडीचे अध्यक्ष सुशील राठोड, तसेच नगरसेवक, पदाधिकारी व विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
या आरोग्य शिबिरात विविध विभागांच्या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन व उपचार केले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण 2 हजार 84 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. तपासणीनंतर शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी सावंगी येथील दत्ता मेघे रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. तसेच आयुष्मान भारत योजनेसाठी 494 लाभार्थ्यांनी नोंदणी केली.
 
 
या अभियानासाठी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवतीसेना, चैतन्य ग्रुप ऑफ स्पोर्ट, ज्येष्ठ नागरिक मंडळ, अहिल्यादेवी होळकर समिती, दारव्हा शहरातील विविध सामाजिक संघटना, महिला बचत गट, मेडिकल असोसिएशन, उपजिल्हा रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बानोत, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा सेविका तसेच समस्त शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.
हृदयविकाराचा झटका..!
 
 
शिबिरादरम्यान पिंपळखुटा येथील श्रीराम चव्हाण यांना हृदयविकाराचा झटका आला होता. विकास क्षीरसागर व विवेक जाधव यांनी तत्परता दाखवत त्यांना तत्काळ यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करून त्यांना मोलाची मदत केली.