अर्ज लॉक, आता नजरा प्रवेश वाटपाकडे

- उद्या होणार महाविद्यालय निश्चित - नागपूरच्या ४५ हजार विद्यार्थ्यांची संपली प्रतीक्षा

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
application-for-admission : अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नागपूर विभागातील विद्यार्थ्यांचा उत्साह कायम असून, नियमित प्रवेश फेरीत आतापर्यंत ४५ हजार २९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज निश्चित (लॉक) केले आहेत. तिसऱ्या नियमित प्रवेश फेरीसाठी अर्ज निश्चित करण्याची मुदत २० जूनपर्यंत होती.
 
 
NGP
 
 
 
 
शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नागपूर विभागात ४१ हजार २४८ विद्यार्थ्यांनी कॅप (केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया) अंतर्गत अर्ज निश्चित केले आहेत. तर ४ हजार ४८ विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी अर्ज लॉक केले आहेत. या दोन्हींची एकत्रित संख्या ४५ हजार २९६ इतकी झाली आहे.
 
उद्या होणार प्रवेश वाटप
 
 
तिसऱ्या नियमित फेरीतील कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रवेश वाटप २३ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेल्या महाविद्यालयात २३ जून दुपारी १२ ते २५ जून सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रत्यक्ष प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे.
 
विद्यार्थी-पालकांनी घ्यावी नोंद
 
 
प्रवेश वाटपानंतर निर्धारित कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात हजर राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेतील पुढील सर्व सूचना आणि अद्ययावत माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.