भंडारा,
Avinash Brahmankar won in Bhandara-Gondia भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दमदार विजय मिळवत आपली राजकीय पकड अधिक मजबूत केली आहे. भाजपचे उमेदवार अविनाश ब्राम्हणकर यांनी प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेत विजय संपादन केला. मतमोजणीदरम्यान सुरुवातीपासूनच अविनाश ब्राम्हणकर आघाडीवर होते. अखेरच्या निकालात ब्राम्हणकर यांना एकूण ३०२ मते मिळाली. तर काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना १५४ मते मिळाली. याशिवाय एक मत अवैध ठरले.
या निकालामुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. दुसरीकडे, काँग्रेस समर्थित गटाला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आले नाही. या विजयामुळे आगामी स्थानिक आणि प्रादेशिक राजकारणात भाजपची ताकद आणखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.