वजन काट्यात हेराफेरी करणार्‍या अडते, व्यापार्‍यांवर कारवाई करा

*शेतकर्‍यांची आष्टी बाजार समितीवर धडक

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
तळेगाव (श्या. पं.), 
ashti-market-committee : कृषी उत्पन्न बाजार समिती, आष्टीच्या मंडीमध्ये शेतमाल खरेदीदार अडते, व्यापार्‍यांकडून वजन काट्यात होत असलेल्या हेराफेरीबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीकरिता शेतकर्‍यांनी २२ रोजी बाजार समितीत धडक दिली. दोषींवर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन बाजार समितीचे सचिव नितीन चोपडे यांना दिले.
 
 
 
JLK
 
 
 
कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर विकायला आणलेल्या शेतकर्‍याच्या वजनात विंटलमागे तब्बल ४ किलोची दांडी मारल्याने प्रकरण चांगलेच गाजत आहे. १८ जून रोजी शेतमाल खरेदीदार अडते नितीन निमकर्डे, मंगेश बालपांडे यांनी शेतकर्‍याची फसवणूक केल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. आष्टीच्या मंडीतील नोंदणीकृत अडते, व्यापारी यांच्या वजन काट्यांची तपासणी करावी, इलेट्रॉनिस वजन काट्याची खात्री करण्याकरिता कॅलिब्रेटेड वेट (लोखंडी वजन गोटा) नियमित ठेवण्यात यावा, कट्ट्यामागे ८०० ग्रॅम वजनाची तूट घेणार्‍यांवर कारवाई करावी, शेतमाल विक्रीनंतर अडते, व्यापार्‍यांकडून एक ते दोन टके दलाली कापणार्‍या अडते, व्यापार्‍यांवर कारवाई करावी, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. दोषींवर कारवाई न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
 
 
निवेदन देताना भाजपाचे नेते अशोक विजय, ओंकार भोजने, अजय बानाईत, मनीष ठोंबरे, वसंत पोटे, दीपक राणे, अमोल माहोरे, अशोक शिरभाते, सुनील देशमुख, आदींसह शेतकरी उपस्थित होते.