लेबनॉनच्या गर्भात हिजबुल्लाहचा 'ड्रोन गेम'

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
लेबनॉन,
Hezbollah's Drone Game दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली सीमेजवळ हिजबुल्लाहचा एक मोठा गुप्त भूमिगत ड्रोन अड्डा उघड झाल्याने मध्यपूर्वेत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. इस्रायली लष्कराने डोंगराखाली लपवून ठेवलेली ही अत्याधुनिक सुविधा शोधून काढत हिजबुल्लाहच्या लष्करी क्षमतेबाबत मोठा खुलासा केला आहे.इस्रायली अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या गुप्त केंद्राचा वापर इराणमध्ये तयार होणारे ड्रोन एकत्र जोडण्यासाठी आणि इस्रायलच्या दिशेने हल्ल्यांसाठी सज्ज करण्यासाठी केला जात होता. हा संपूर्ण प्रकल्प गेल्या अनेक वर्षांत उभारण्यात आला असून, त्यामागे थेट इराणी मदत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
 
 
 
ebanon
मजदल जौन गावाजवळ सापडलेल्या या अड्ड्यात अनेक बोगदे, सुरक्षित खोल्या आणि उच्च दर्जाची संरचना आढळून आली. डोंगराच्या आत शेकडो मीटरपर्यंत पसरलेल्या या बोगद्यांची खोली जमिनीखाली सुमारे 29 मीटरपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण परिसराचे संरक्षण स्फोटरोधक स्टील दरवाज्यांनी करण्यात आले होते.कारवाईदरम्यान इस्रायली सैनिकांना मोठ्या प्रमाणात ड्रोनचे सुटे भाग, असेंब्लीसाठी वापरली जाणारी उपकरणे आणि हल्ल्यासाठी तयार ठेवलेले ड्रोन सापडले. अंदाजे 50 ड्रोन जप्त करण्यात आले असून, त्यापैकी अनेकांवर स्फोटके बसवलेली होती. प्रत्येक ड्रोन सुमारे 30 किलोपर्यंत स्फोटक वाहून नेण्यास सक्षम असल्याचे सांगितले जात आहे.
 
इस्रायली लष्कराच्या मते, हे ड्रोन पूर्वी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यांमध्ये वापरण्यात आलेल्या मॉडेलसारखेच आहेत. त्यामुळे देशातील महत्त्वाच्या लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता या ड्रोनमध्ये होती. या कारवाईमुळे हिजबुल्लाहच्या गुप्त रणनीती आणि त्याच्या तांत्रिक क्षमतेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या खुलाशानंतर मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, इस्रायल-हिजबुल्लाह संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.