तभा वृत्तसेवा
कळंब,
jagadamba-pharmacy-students : औषधनिर्माण शिक्षण क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या कलंब येथील जगदंबा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वार्षिक परीक्षा 2026 च्या निकालात उल्लेखनीय यश संपादन करून जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला आहे.
डीफार्म प्रथम वर्षामध्ये हितेश्री गोविंद मुंडाळे हिने 83.2 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. शिवम प्रेमकुमार जयस्वाल याने 76.7 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर जय साहेबराव बोटरे याने 75.5 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. डीफार्म द्वितीय वर्षामध्ये काझी मुशफिका झुल्फिकार हिने 86.82 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. ईफरा कशफ सैयद अझहरअली हिने 84.36 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर शेख शिफा अजीज हिने 80.82 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. तसेच प्रथम व द्वितीय वर्षातील अनेक विद्यार्थ्यांनी 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
संस्थेचे सचिव डॉ. शितल वातिले यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेसोबतच उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर विशेष भर दिला जातो. तसेच जगदंबा विद्यालय समूह हा उत्कृष्ट कॅम्पस प्लेसमेंटसाठी विदर्भात विशेष ओळखला जातो.
संस्थेतील विद्यार्थी दरवर्षी विविध प्रवेश परीक्षांमध्ये यश संपादन करून देशातील नामांकित महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. राहुल बिजवार यांनी विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डीफार्म व बीफार्म अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन केले. या यशाबद्दल संस्थेचे संचालक पवन वातिले, विभागप्रमुख सुबोध ढोणे तसेच सर्व शिक्षक व कर्मचाèयांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.